विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज नाही – चंद्रकांत पाटील

0
372

मुंबई, दि, ३१ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत . मात्र इतर पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जात असताना पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असे बोलले जात आहे मात्र असे काही होत नाही. जे लोक नाराज आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक प्रवेश करत आहेत त्यांची सामाजिक आणि राजकीय ताकद पाहूनच पक्षप्रवेश दिला जात आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी नेते गणेश नाईक यांच्या पक्षप्रवेशावरुन भाजपाच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे नाराज नाहीत, अशी माहितीही पाटील यांनी दिली .