चिखलीत महिलेला ब्लॅकमेल करुन बलात्कार; दोघांवर गुन्हा

0
831

चिखली, दि. ३१ (पीसीबी) – झालेल्या चुकांची माफी मागण्याच्या बहाण्याने महिलेला लॉजवर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन बलात्काराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. तसेच त्या व्हिडीओच्या आधारे महिलेला वारंवार ब्लॉकमेल करुन बलात्कार केला. ही धक्कादायक घटना चिखली येथून समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित ३० वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवींद्र लसणे (वय ३०, रा. उलवेगाव, नवी मुंबई) आणि त्याचा मित्र दीपक पाटील (रा. मोरेवस्ती चिखली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१० मध्ये आरोपी रवींद्रकडून झालेल्या चुकांची माफी मागण्यासाठी रवींद्र याने पीडित महिलेला एका लॉजवर नेले. तेथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. हा संपूर्ण प्रकार त्याने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर महिलेचे लग्न झाले तिला दोन मुलं देखील आहेत.  आरोपीने ऑगस्ट २०१८ मध्ये पुन्हा पीडित महिलेचा नाव पत्ता शोधून काढला आणि तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र महिलेने यासाठी नकार दिला असता रवींद्रने तिच्या पतीला आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपी रविंद्र याने वेळोवेळी कारमध्ये, लॉजवर अशा विविध ठिकाणी नेऊन पीडितेवर बलात्कार केला. तसेच तिच्यासोबत अनैंसर्गिक कृत्यू देखील केले. आणि पीडित महिला काम करत असलेल्या रुग्णालयात जाऊन आरोपी रविंद्र याचा मित्र दीपक पाटील याने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलिस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करत आहेत.