११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत मोठा निर्णय होणार; भद्राचार्यजी महाराजांचा दावा

0
505

अयोध्या, दि. २५ (पीसीबी) –  राम मंदिर उभारण्याबाबत पंतप्रधान मोदी फसवणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करून ११ डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत काहीतरी मोठा निर्णय होणार आहे, असा दावा  पद्मविभूषण जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.

विश्व हिंदू परिषदेने आज (रविवार)  राम मंदिराच्या निर्माणासाठी अयोध्येत धर्मसभेचे आयोजन केले होते. यावेळी स्वामी राम भद्राचार्यजी महाराज बोलत होते.

राम मंदिराच्या मुद्यावर आमच्यात आणि केंद्रातील एका ज्येष्ठ मंत्र्यांबरोबर १० मिनिट चर्चा झाली. ११ डिसेंबरनंतर कदाचित राम मंदिराबाबत अध्यादेश किंवा ठोस निर्णय होऊ शकतो. सरकार ६ डिसेंबरलाच काहीतरी करणार होते, मात्र आचारसंहितेमुळे त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. असा दावा स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.

दरम्यान, या सभेसाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाखो नागरिक या धर्मसभेसाठी एकत्र आले आहेत.