हे राम… ‘या’ बीचवर औंधचे तीन पर्यटक बुडाले

0
250

रत्नागिरी, दि. १८ (पीसीबी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्रकिनारी सहा पर्यटक बुडाले. त्यापैकी ती पर्यटकांचा मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे. आंजर्ले बीच हा धोकादायक समजला जातो. हे सर्व जण पुणे जिल्ह्यातील औंधमधून आले होते. निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पालांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे अशी या सहा पर्यटकांची नावं आहेत. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.

लॉकडाऊनच्या नियम-अटी शिथील झाल्यानंतर पर्यटक आता समुद्रकिनारी फिरण्यासाठी जात आहेत. असेच पुण्यातील सहा जण फिरण्यासाठी रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्रकिनारी आले. यावेळी हे सहा जण पाण्यात उतरले. पोहण्याचा आनंद घेत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने सहापैकी तीन जण बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर स्थानिकांनी तीन जणांना वाचवलं असून त्यांना उपचारांसाठी दापोलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.