गोलंदाजांच्या कामिगरीने भारताचे एक पाऊल पुढे

0
197

अॅडलेड,दि. १८ (पीसीबी) – क्षेत्ररक्षकांकडून म्हणावी तशी साथ मिळत नसतानाही गोलंदाजांच्या भेदक कामगिरीने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे एक पाऊल पुढे राहिले. दिवसभरात गोलंदाजांनी वर्चस्व राखले. आजच्या दिवसभराच्या खेळात १५ गडी बाद झाले. यातही वेगवान गोलंदाजांबरोबर भारताच्या ऑफ स्पिनर अश्विनची कामगिरी नजरेत भरली.

दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेरीस भारताने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आपली आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. त्यापूर्वी, सकाळी भारताचा डाव जेमतेम २० मिनिटे टिकला. कालच्या धावसंख्येत अकरा धावांचीच भर घालून २४४ धावांवर त्यांचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि भारतीय क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पण, भारतीय वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज आर. अश्विन यांनी कमालीच्या टप्प्यावर मारा करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जेरीस आणले. त्यांचा डाप १९१ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार टिम पेन याची नाबाद ७३ धावांची खेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरली

दुसऱ्या दिवसात क्षेत्ररक्षण हा मुद्दा ऐरणीवर राहिला. भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व राखून होते. मात्र, क्षेत्ररक्षकांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने त्यांना मोठे यश मिळू शकले नाही. भारतीय क्षेत्ररक्षकांकडून ढिगभर झेल सोडले गेले. त्यात दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या यष्टिरक्षक टिम पेन यांनी सोडलेल्या झेलची भर पडली.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय माऱ्याचा सामना करू शकले नाहीत हेच खरे. पेनचे अर्धशतक आणि नशिबाची पुरेपूर साथ मिळालेल्या लाहबुशेनच्या ४७ धावा वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज पंधरा आणि त्याच्या आसपास अडकले. दोन वर्षापूर्वी प्रमाणेच सगळे काही या कसोटीत घडत नव्हते. त्या वेळी दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज यशस्वी झाले होते. पण, आज ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही भारताची सलामीची जोडी टिकू दिल नाही. पुन्हा एकदा पृथ्वी शॉ झटपट बाद झाला. आता उद्या सकाळच्या सत्रातील तासाभराचा खेळ महत्वाचा ठरेल.

भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. बुमरा आणि उमेश यादव यांनी चांगली सुरवात केली होती. त्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीतही कमालीची अचूकता होती. महंमद शमीला खूप उशिराने गोलंदाजीला आणले गेले यामागचे कारण कळत नसले, तरी त्याचा मारा कमालीचा भेदतृक होता. अश्विनने खेळपट्टीच्या वेगाचा उपयोग करताना चेंडूला चांगली उंची दिली. त्याने चेंडू टाकण्यात दाखवलेली विविधता लक्षणीय ठरली.