हे तर ‘इलेक्शन बजेट’; मनमोहन सिंगांची टीका

0
673

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाचे ‘निवडणूक अर्थसंकल्प’ असे वर्णन  काँग्रेस नेते व  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज (शुक्रवार) सादर केलेला हंगामी अर्थसंकल्प निवडणुकांशी संबंधित आहे. मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर या अर्थसंकल्पाचा परिणाम दिसून येईल, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

निवडणूक वर्षातील मध्यमवर्ग, छोटे शेतकरी आणि ग्रामीण लोकसंख्येला सुखावणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हे इलेक्शन बजेट आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना देण्यात आलेल्या सवलतीचा निवडणुकीशी संबंध आहे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

मनमोहन सिंग यांची आर्थिक सुधारणा कार्यक्रमांसाठी ओळख आहे. तत्कालिन नरसिंह राव सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री होते. १९९१ साली त्यांनी आर्थिक सुधारणा जाहीर केल्या होत्या. हंगामी अर्थसंकल्पात सरकारने होणाऱ्या खर्चावर काम केलेले नाही, असे ते म्हणाले.