कासारवाडीत टोळक्यांचा धुमाकुळ; बंदुकीचा धाव दाखवून केली लुटमार

0
514

कासारवाडी, दि. २९ (पीसीबी) – भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती केल्याने ८ ते १० जणांच्या टोळक्यांनी ५ के ६ जणांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करुन लुटले. ही घटना रविवारी (दि.२८) रात्री सव्वा बाराच्या सुमारास कासारवाडी रेल्वे गेटजवळ घडली.

याप्रकरणी धनराज दिनेश पंडराम (वय १९, रा. राधा निवास, साईनगर, रेल्वे गेटजवळ, कासारवाडी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रावण उर्फ सर्फराज, बंटी गावडे, इऱ्या, अरबाज, अक्षय कांबळे, मेघराज, बश्श्या आणि अनोळखी ४ ते ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बाराच्या सुमारास कासारवाडी रेल्वे गेटजवळ फिर्यादी धनराज यांचा मित्र पम्मी याला आरोपी रावण हा मारहाण करत होता. यावर धनराज यांनी मध्यस्ती करुन भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या खिशातील १ हजार रुपये रावण याने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच धनराज यांची भाडेकरु महिला, त्यांचे आजोबा देवराजन आणि मित्र अमजद शेख आणि इतर लोकांना आरोपींनी मारहाण करुन फरार झाले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक गाढवे तपास करत आहेत.