हुक्का पॉट आणि हुक्का फ्लेवर विकणा-या हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा

0
211

हिंजवडी, दि. १६ (पीसीबी) – हॉटेलच्या काउंटरवर बेकायदेशीररित्या हुक्का पॉट आणि हुक्का फ्लेवर विकणा-या हॉटेल व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) भूगाव रोड, बावधन येथील मिंटलीफ बी 2 लाउंज हॉटेल येथे करण्यात आली आहे.

प्रसाद विजयकुमार दातीर (वय 26, रा. गुरुवार पेठे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद हा भूगाव रोड, बावधन येथील मिंटलीफ बी 2 लाउंज या हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याने हॉटेलच्या काउंटरवर विनापरवाना, बेकायदेशिररित्या 2 हजार 800 रुपयांचे चार हुक्का पॉट, चार हुक्का पाईप, नऊ 9 हजार रुपयांचे सहा हुक्का फ्लेवर बॉक्स विक्रीसाठी ठेवले होते. हिंजवडी पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यावर कारवाई करत हॉटेलच्या व्यवस्थापकावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण) सन 2003 चे कलम 4 (अ), 5, 6, 7, 8, 20 (2), 21 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.