अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

0
279

तळवडे, दि, १६ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली.यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 8 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वासहा वाजता ज्योतिबा मंदिरासमोर तळवडे येथे झाला.

कैलास किसान खोडके (वय 27, रा. तळवडे चौक, तळवडे) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत लक्ष्मी कैलास खोडके (वय 23) यांनी गुरुवारी (दि. 15) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयात कैलास त्यांच्या कामासाठी पहाटे सव्वासहा वाजता घराबाहेर गेले होते. ज्योतिबा मंदिरासमोरील रस्त्यावरून पायी चालत जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये कैलास यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.