‘ही तर प्रॅक्टिस, रिअल काम नंतर’; पंतप्रधान मोदींचे सुचक विधान

0
505

नवी दिल्ली ,  दि. २८ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ही तर फक्त प्रॅक्टिस, रिअल काम नंतर, असे सूचक विधान  केले आहे.  विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. 

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली. अभिनंदन यांच्या सुटकेची बातमी येताच मोदींनी आपल्या भाषणात अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली.

तुम्ही कायम प्रयोगशाळेत जीवन व्यतीत करणारे लोक आहात. एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्टवर काम करण्याची सवय असते. असाच एक ‘पायलट’ प्रोजेक्ट आम्हीही यशस्वी केला आहे, असे मोदी म्हणाले.