प्रशांत परिचारकांचे निलंबन मागे; शिवसेनेचा सभापतींच्या कार्यालयात जाऊन निषेध

0
584

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान करणारे विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. यावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन सभापतींनी अचानक मागे घेतल्यामुळे विरोधी पक्षांचे नेते आणि शिवसेना आमदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना मंत्री दिवाकर रावते इतके संतापले की त्यांनी थेट सभापतींच्या कार्यालयात जाऊन निषेध व्यक्त केला.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे येथे उमेदवाराच्या प्रचारसभेत, विरोधकांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत परिचारक यांनी अपमानास्पद  विधान केले होते.