मारुंजीत तरुणीवर बालात्कार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

0
799

हिंजवडी, दि. २८ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या एका तरुणास  हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पिडित ३० वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, योगेश गणेश भानुसे (वय ३३, रा. भानुसे वस्ती, मारूंजी, ता. मुळशी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याने पिडित ३० वर्षीय तरुणीवर मार्च २०१७ ते ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत मारुंजी येथे कारमध्ये स्वता:च्या घरी आणि पिडितेच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी योगेश याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर अधिक तपास करत आहेत.