‘हि’ अभिनेत्री म्हणते, ‘सरकारी शाळा बेशिस्त असतात…’; वादग्रस्त शो ‘बिगबॉस’मध्ये सुद्धा आहे तिचा सहभाग

0
243

कलर्स हिंदी या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त रियॅलिटी शो छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. या रिअॅलिटी शो च्या १४ व्या सिझन मध्ये शो शेवटच्या टप्प्यात आलेला असतानाच प्रत्येक स्पर्धक ‘बिग बॉस’मध्ये टिकून राहण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करताना दिसला. मात्र या प्रयत्नांचं रुपांतर अनेकदा भांडणामध्ये होताना दिसलं.

असाच एक प्रयत्न सुरु असताना अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिने या शो मध्ये केला आणि काही काही स्पर्धकांची तुलना चक्क सरकारी शाळांशी केली. “ज्या प्रमाणे सरकारी शाळा बेशिस्त असतात तसेच काही स्पर्धक बेशिस्त आहेत.” असं ती म्हणाली. आणि तिच्यावरती एकच टीकेची झोड उडाली. या वादग्रस्त विधानामुळे ती ट्रोलर्स च्या निशाण्यावर आली. आणि टीकेची धनी बनली. त्यामुळे जॅस्मिनला शोमधून बाहेर काढा अशी मागणी काही संतापलेले प्रेक्षक करत आहेत.

शेवटी कोणताच पर्याय शिल्लक नसताना वाढत्या टीकेनंतर जॅस्मिननं देखील या संतापलेल्या प्रेक्षकांची माफी मग्न पसंत केलं. “मला सरकारी शाळांचा अपमान करायचा नव्हता. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागते. माझी आजी, आई, वडिल शिवाय कुटुंबातील अनेक सदस्य सरकारी शाळांमध्येच शिकून मोठे झाले आहेत. मला देखील सरकारी शाळांचा अभिमान आहे.” अशा आशयाचं वक्तव्य करत तिने संतापलेल्या प्रेक्षकांची माफी सुद्धा मागितली.