हिम्मत ठेवा, निराश होऊ नका; मोदींनी थोपटली इस्रोच्या वैज्ञानिकांची पाठ

0
539

बंगळुरू, दि. ७ (पीसीबी) – चंद्रावर उतरण्यास अवघी दोन मिनिटे बाकी असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर या मिशनवर काम करणाऱ्या सर्व वैज्ञन्यानिकांचा चेहरा पडला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांची पाठ थोपाटली आहे. ‘हिंम्मत ठेवा, निराश होऊ नका, तुमचा देशाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.

गेली तीन वर्षे शास्त्रज्ञांनी चांद्रयानवर खडतर मेहनत घेतली आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. सर्व शास्त्रज्ञांनी विज्ञानाची आणि देशाची मोठी सेवा केली आहे. तूम्ही धीर सोडू नका, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञाचे मनोधोर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

प्रत्योकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. संपर्क तुटल्यानंतर तुम्ही निराश झालेलं मी पाहिलं. निराश होऊ नका, तुम्ही केलेले काम छोटे नाही.हिम्मत गमावू नका. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो असे सांगितले आहे.मी आणि संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा.

विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला आहे. निश्चित संकेत प्राप्त होईपर्यंत ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. विक्रम लँडरशी संपर्काची आम्हीही वाट पाहतोय. सध्या डेटाची तपासणी केली जात आहे. लवकरच याबाबत माहिती देऊ, असे इस्त्रोने सांगितले आहे.

विक्रमसोबत संपर्क तुटल्यानंतर इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांच्याशी मोदी यांनी चर्चा केली. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्व वैज्ञानिकांची मोदी यांनी पाठ थोपाटली आहे. यावेळी एतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या ६० विद्यार्थांसोबतही मोदी यांनी संवाद साधला आहे. ‘दृढनिश्चयी राहण्यासाठी आम्ही काय करायला हवं’, असे उपस्थित विद्यार्थांनी यावेळी मोदींना प्रश्न विचारला, त्यावेळा ते म्हणाले की, लक्ष्य मोठे ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी जोडा. जे गेले ते सोडून द्या, त्याने निराशा येते. ती नकारात्मकता सोडून द्या, असे मोदी म्हणाले.