‘इस्रो’ प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर; मोदींनी दिला धीर

0
325

बंगळुरू, दि. ७ (पीसीबी) – ‘इस्रो’च्या कंट्रोल रुममधून संपूर्ण देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित सर्व शास्रज्ञांचे कौतुक केल्यानंतर जेव्हा निरोपाचा प्रसंग आला तेव्हा इस्रो कंट्रोलरुममध्ये भावनांचे वेगळेच रुप पाहाचला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना भेटत असताना त्यांना जवळ घेत मिठी मारली. यावेळी सद्गदीत झालेल्या के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या कंट्रोल रुमला भेट देत देशाला उद्देशून भाषण केले. या वेळी त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले. मी इथे तुम्हाला उपदेश देण्यासाठी आलेलो नाही.

आज सकाळी सकाळी तुमच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणूनच तुमचे मी दर्शन घेतले आहे. तुम्ही स्वत:च एक प्रेरणेचा सागर आहात. आम्ही सारे अमृताचे पुत्र आहोत, अमृताशी अमरत्व जोडलेले असते. अशा लोकांच्या पुढे अपयश कधीच नसते, आम्ही पुढे नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला.

मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे, असे म्हणत मोदी यांनी उपस्थित सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला.

भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्व शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी कंट्रोल रुपमध्ये फिरले. प्रत्यकाच्या हाताशी हात देत मोदींनी सर्वांचे अभिनंदन, कौतुक करत धीर दिला.