हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत ९ वर्षीय मुलीवर विधी संघर्षीत बालकाने केला अत्याचार

1938

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत एका ९ वर्षीय मुलीवर विधी संघर्षीत अल्पवयीन बालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १३ वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षीत बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास आरोपी विधी संघर्षीत बालकाने ९ वर्षीय मुलीला त्याच्या मावशीच्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आणि घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी त्यानुसार आरोपी मुलाला अटक करुन बालसुधारगृहात त्याची रवानगी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपनर तपास करत आहेत.