हिंजवडीला बांधकाम मजुरांचा रस्त्यावरच धिंगाणा

0
425

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) : हिंजवडी आयटी परिसरातील माण गावच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील पाचशेहून अधिक परप्रांतीय मजुरांनी धिंगाणा घातला. मागील महिण्या भरापासून सर्वच काम बंद असल्याने आमचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे. त्यामुळे आम्हाला गावी जाण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी रस्त्यावर उतरून लोकडाऊनला विरोधच केला.

माण (ता. मुळशी) येथील शापुरजी पालमजी जॉयव्हीला या बांधकाम प्रकल्पात काम करणारे हे शेकडो मजूर होते. काही कालावधी राष्ट्यावर राडा घातल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण मिळवले. पुन्हा प्रकल्पात नेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर ते शांत झाले. कोरोनामूळे या बांधकाम साइटवर सुमारे एक हजारहून अधिक परप्रांतीय मजूर मागील एक महिन्यापासून अडकून पडले आहेत. प्रकल्प व्यवस्थापनाने त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली असली तरी ठेकेदाराकडून त्यांना वेळेत पगार व खर्ची मिळत नसल्याचा आरोप यावेळी मजुरांनी केला. मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेआकराच्या सुमारास हे सर्व मजूर प्रकल्पातील मजूर वसाहतीतून बाहेर पडले व घोषणाबाजी करत माण हिंजवडी मुख्य रस्त्याने हिंजवडीच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांनी अन्य बांधकाम साईटवरील मजुरांना देखील या मोर्चात सहभागी होण्यास गळ घातली, परंतु हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले. हिंजवडीचे वरीष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, निरिक्षक अजय जोगदंड यांनी मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन जमावाला शांत केले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रकल्प व्यवस्थापकांना बोलावून घेतले व मजुरांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

यावेळी माणचे सरपंच राजेंद्र भोसले, सुनील भरणे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करत जमावावर नियंत्रण मिळवले. माजी सरपंच भरणे यावेळी म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर तसेच येथील दानशूर व्यक्ती आशा मजुरांसाठी कायम मदतीसाठी उपलब्ध आहेत. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी केवळ आर्थिक हित न पाहता, मजुरांची हमी स्वीकारली पाहिजे. आशा प्रकारे मजूर रस्त्यावर उतरत असतील तर कोरोना विरुद्ध लढाई यशस्वी होऊ शकत नाही. पोलिस निरीक्षक गवारी म्हणाले, ”लाॅकडाऊन उठवणे किंवा रेल्वे चालू करणे आमच्या हातात नाही परंतु शासन लवकरच याबाबत काहीतरी निर्णय घेईल. तोपर्यंत तुम्ही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा आशा प्रवृत्तीवर कारवाई करावी लागेल. यावेळी मजूर म्हणाले, आम्हाला आमच्या मूळगावी कुटूंबाकडे जाउद्यात. ठेकेदाराने खर्ची दिली तरी पगारातून कट करणार असल्याची भीती मजुरांमध्ये आहे. उधार घेतलेल्या किराणा मालाची रक्कम प्रकल्प व्यस्थापनाने भरावी. काम नसले तरी आमचा पूर्ण पगार आमच्या हातात द्यावा तो ठेकेदाराकड देऊ नये. लाॅकडाऊन उठण्याची शक्यता दिसत नाही, त्यामुळे सरकारने मजुरांसाठी रेल्वे सुरू कराव्यात.

——