हिंजवडीत २२ हजारांच्या गांजासह तरुणाला अटक

0
681

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) – विक्रीसाठी आणलेला २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाच्या गांजासह एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई  हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.

जुबेर मौला अत्तार (वय २९, रा. संदिप गायकवाड यांची चाळ, माळवडी, पुनवळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेकडी अंमली पदार्थ विरोधी पथक हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील कोयते वस्तीकडून काटे वस्तीके जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी स्टाफसह त्या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी जुबेर अत्तार नावाचा तरुण संशयीतरित्या हातात पिशवी घेऊन उभा असलेला दिसून आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळीला पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये २२ हजार ६५० रुपये किमतीचा एकूण १ किलो ६६० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन आरोपी जुबेर अत्तार याला अटक केली. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला हिंजवडी पोलीसांच्या ताब्यात दिले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई  अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, वसंत मुळे, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, प्रसाद जंगीलवाड, दादा धस, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने केली.