हिंजवडीत हॉर्न वाजविल्याप्रकरणी कार चालकाकडून दुचाकीस्वाराला रॉडने मारहाण

0
2016

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – हॉर्न वाजविल्याप्रकरणी दुचाकीस्वाराला कार चालकाने शिवीगाळ करत रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला. ही घटना हिंजवडीतील राधा चौकात गुरूवारी (दि.३) सायंकाळी ७ वाजता घडली.

या प्रकरणी दुचाकीस्वार अक्षय प्रकाशराव भोजणे (वय.२९ रा. गुरूप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोजणे गुरूवारी सायंकाळी हिंजवडीतील राधा चौकातून आपल्या दुचाकीवरून  निघाले होते. यावेळी त्यांनी दुचाकीचा हॉर्न दिला. यामुळे संतापलेल्या कार चालकाने खाली उतरून अक्षयला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणाचा हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.