हिंजवडीत पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न

0
616

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – कामावरुन घरी जात असलेल्या पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी फेज-२ येथे घडली.

याप्रकरणी पारुल राजनारायण पाल (वय २४, रा. सारथी सवरींग सोसायटी, हिंजवडी फेज-२) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी पाल हे नेहमीप्रमाणे कामावरुन सुटून घरी जात होते. दरम्यान, हिंजवडी येथील फेज २ येथील पंजाबी रसोई हॉटेलशेजारील गल्ली येथे आले असता पाठीमागून आलेल्या एकाने त्यांच्या गळ्याला पकडले. तसेच त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरुन घेवून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.