कासारवाडीत कामगाराच्या पगारासाठी ठेवलेल्या पैशांवर चोरट्याचा डल्ला

0
414

कासारवाडी, दि. ३० (पीसीबी) – हॉटेलातील कामगारांच्या पगारांसाठी व भाजीपाल्यासाठी ठेवलेल्या पैशांवर एकाने डल्ला मारला. हा प्रकार कासारवाडी येथून उघडकीस आला.

याप्रकरणी रूपेश ज्ञानेश्वर घुंबरे (वय २६, रा. विठ्ठल रूक्मिनी मंदिराजवळ, कासारवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मराठा खानावळ नावाचे कासारवाडीत हॉटेल आहे. या खानावळीतील कामगारांच्या पगारासाठी व भाजीपाल्यासाठी फिर्यादी यांचे दाजी दिलीप उमाप यांनी १ लाख रूपये दिले होते. ही रक्कम फिर्यादी यांन घरातील ठेवली होती. फिर्यादीचा मित्र सचिन कुकाळे यांच्याकडून आरोपी दिलीप यादवने घराची चावी घेऊन मोबाईलच्या बॉक्समध्ये ठेवलेली १ लाखांची रोकड घेऊन पसार झाला. भोसरी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.