हिंजवडीत दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
529

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – मित्रासोबत शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका ५० वर्षीय इसमाचा दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.४) रात्री पावणेआठच्या सुमारास पुनावळे येथील बँगलोर-मुंबई सर्विसरोडवर घडली.

राजेंद्र चंद्रभाण जगताप (वय ५०, रा. स्वराज सोसायटी, माळवाडी, पुणे) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे मित्र सुनिल दगडु ढवळे (वय ४९, रा. ढवळेवस्ती, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, (एमएच/१४/बीवाय/४१२७) या क्रमांकाच्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास फिर्यादी सुनिल आणि त्यांचे मित्र राजेंद्र जगताप हे दोघे पुनावळे येथील बँगलोर-मुंबई सर्विसरोडवर शतपावली करण्यासाठी गेले होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या (एमएच/१४/बीवाय/४१२७) क्रमांकाच्या दुचाकीवरील दोन इसमांनी राजेंद्र यांना जोरदार धडक दिली. यामध्ये राजेंद्र यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ते तोघेही दुचाकीसह पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करत आहेत.