हिंजवडीत घरमालकीनीचा भाडेकरुनेच केला विनयभंग

0
608

हिंजवडी, दि. २ (पीसीबी) – डिपॉझिटसाठी दिलेल्या पैशांवरून भाडेकरू आणि महिला घर मालकिनीचे भांडण झाले. भांडणात भाडेकरूने मालकिनीचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. १) दुपारी दीडच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी २६ वर्षीय महिला घरमालकिनने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संदीप तालेरी (रा. हैदराबाद) या भाडेकरु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी गेस्ट हाऊस ब्ल्युरीच हिंजवडी येथे फिर्यादी महिलेचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये संदीप मागील काही महिन्यांपासून भाड्याने राहत आहे. महिलेने त्यांचा हा फ्लॅट प्रल्हाद मोदी यांना काही दिवसांपूर्वीच विकला. त्यामुळे त्यांनी संदीप याला फ्लॅट खाली करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच सांगितले होते. तरीही त्याने फ्लॅट खाली केला नाही.

त्याच्या मागे लागल्यामुळे त्याने शनिवारी दुपारी फ्लॅट खाली केला. त्यानंतर मोदी यांनी फ्लॅटच्या रकमेचा चेक महिलेला दिला. त्यामुळे फिर्यादीकडे संदीपला डिपॉझिटचे पैसे देण्यासाठी रोख रक्कम नव्हती. त्यामुळे त्यांनी सोमवारी पैसे देण्याचे सांगितले. यावरून फिर्यादी महिला, त्यांचा भाऊ आणि संदीप यांच्यात भांडण झाले. या भांडणात संदीप याने महिलेच्या भावाला मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.