पुण्यातील राज ठाकरेंच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मोबाईल बंदी

0
534

पुणे, दि. २ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे  तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यांवर आले आहेत. त्यांनी शाखाध्यक्षांशी चर्चा करण्यासाठी आज (रविवार) बैठक घेतली.  या बैठकीला येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात  आले.  बैठकी मधील माहिती प्रसार माध्यमांना मिळू  नये. यासाठी ही खबरदारी घेतली  असल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. तर बैठकीसाठी प्रसारमाध्यमांना देखील आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. पण बैठकीला येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात आले आहेत.

बैठकीमधील कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारमाध्यमांना मिळू नये.  यासाठी  राज ठाकरे यांच्याकडून आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबत  काळजी घेण्यात आली आहे .  दरम्यान,  पुण्यातील तीन दिवसीय बैठकीत मनसैनिकांना राज ठाकरे काय कानमंत्र देतात,  याकडे  सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.