हिंजवडीत कस्टम शॉपी लायसन्स मिळवून देतो सांगून महिलेची सव्वाचार लाखांची फसवणूक

0
1028

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – कस्टम शॉपी लायसन्स मिळवून देतो सांगून एका ३६ वर्षीय महिलेला दोघांनी ४ लाख २३ हजार रुपयांना गंडा घातला असून पैसे पुन्हा मागीतल्यास जीवेमारण्याची धमकी दिली आहे. ही घटना जानेवारी २०१८ ते मे २०१८ दरम्यान हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीतील सुसगाव येथे घडली.

याप्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने एक महिला आणि एका पुरुषाविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०१८ दरम्यान आरोपी पुरुष आणि महिलेने फिर्यादी महिलेला कस्टम शॉपीचे लायसन्स मिळवून देतो असे सांगून त्यांना तब्बल ४ लाख २३ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. यावर फिर्यादी महिलेने ते पैसे आरोपींच्या बँक खात्यात टाकले. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपींनी महिलेला कस्टम शॉपी लायसन्स दिले नाही. तसेच आरोपींनी महिलेला फोन करुन पैसे पुन्हा मागीतल्यास जीवेमारण्याची धमकी दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हिंजवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.ए.देवताळे तपास करत आहेत.