हा एका स्त्रीचा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा पराभव – जितेंद्र आव्हाड

0
747

मुंबई,दि.१०(पीसीबी) -हिंगणघाट घटना ही पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा अपमान आहे. ज्या भूमीमध्ये जिजाई, रमाई आणि भिमाई जन्मली त्या भुमीमध्ये आज ही माझ्या भगिणीवर अत्याचार होतो, असं जितेंद्र राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज अखेरचा श्वास घेतला. यावर जितेंद्र आव्हाड यांनी संतत्प प्रतिक्रिया दिली आहे.

हा फक्त एका स्त्रीचा पराभव नाही तर महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू होती, ती सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी संपली. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेनं सकाळी अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राजकीय नेत्यांसोबत कलाविश्वातूनही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं जात आहे.