हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर काँग्रेसचा ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर

0
659

सांगली, दि. १५ (पीसीबी) – सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख  भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देशमुख  सोमवारी (दि.१६)  महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपमध्ये  प्रवेश करतील, अशी  सूत्रांकडून  माहिती मिळत  आहे.

देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास तर काँग्रेसला मोठा धक्का  बसणार आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती.  तेव्हापासून सत्यजित यांनी भाजपामध्ये घेण्याचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू  केले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सोमवारी सांगली जिल्ह्यात आगमन होणार आहे.  त्याआधी आज (रविवार) सांगलीतील शिराळ्यात  आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यात देशमुख  भाजप प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत.