शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना विश्वासघात करणार नाही – आदित्य ठाकरे

0
396

चिपळूण, दि. १५ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी  सज्ज आहे, असे सांगून शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना विश्वासघात करणार नाही,  असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत.  यावेळी  ठाकरे एका वृत्तवाहिनीशी  बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचे गेल्या काही दिवसांत चर्चा सुरु आहे.  त्यावर बोलताना ते म्हणाले की,  युतीबाबत नेमके ठरले आहे. बाहेर कोण काय बोलत आहेत हे मला माहित नाही.  शिवसेना-भाजपमध्ये जे इनकमिंग सुरु आहे, त्यावर आम्ही योग्य उमेदवार पारखून घेत आहोत, असे ते म्हणाले.

राज्यातील  २८८ जागांची चाचपणी करणे,  हे दोन्ही पक्षाचे काम आहे.  कारण दोघांची ताकद तपासणे गरजेचे आहे, त्यासाठी या आढावा बैठका घेतल्या जात आहेत, असे म्हणत युती होणारच असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.  विधानसभा   निवडणूक  लढवण्यास सज्ज आहे.  जनतेने आदेश दिला की निवडणूकही लढेन, असेही  आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.