हनुमंत लांडगे यांची भाजपा प्रदेश कामगार आघाडीच्या सोशल मिडीया प्रमुख पदावर नियुक्ती

0
214

पिंपरी,दि. 19 (पीसीबी) भोसरी – मोशी संतनगर परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत नामदेव लांडगे यांची भाजपा प्रदेश कामगार आघाडीच्या सोशल मिडीया प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेश कामगार आघाडीचे अध्यक्ष गणेश ताठे यांनी हनुमंत लांडगे यांना (दि. 15 जुलै) मुंबईतील बैठकीत नियुक्तीपत्र दिले. हनुमंत लांडगे हे भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे कट्टर सर्मथक म्हणून ओळखले जातात. हनुमंत लांडगे यांनी कामगार क्षेत्रात उल्लेखनिय काम केले आहे. विद्यार्थी दशेत असल्यापासून एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेत काम केले आहे. ते कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. आपल्या संघटन कौशल्यावर त्यांनी लांडगे लिंबाजी तालीम ; अप्पुघर कामगार संघटना, विद्युत तांत्रिक संघटना, टागोर एज्युकेशन ट्रस्ट, एच. ए. स्कूल आणि सी. के. गोयल शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय शिक्षक – पालक संघ ; पिंपरी चिंचवड मनपा सेवकांची पतसंस्था, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ, संत नगर नागरी कृती समिती, इंद्रायणी सेवा संघ अशा विविध सामाजिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्था, संघटनांवर विविध पदांवर काम केले आहे. कामगार क्षेत्रातील त्यांचे योगदान विचारात घेऊन त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले आहे.

तसेच 2007 साली नेपाळ येथे झालेल्या जागतिक कामगार परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याचीही संधी हनुमंत लांडगे यांना मिळाली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी चिंचवड मधिल कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी हनुमंत लांडगे यांचे अभिनंदन केले आहे.