पिंपरी-चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’

0
588

– शहरात ‘बूथ सक्षमीकरण’ अभियान; कार्यकर्त्यांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटी-गाठी!
– मोहननगरमधील भाजपाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये शहर भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन १००+’ हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा ‘शड्डू ठोकला’ आहे.

शहर भाजपातर्फे शनिवारपासून (दि.१७) पक्षाच्या ‘बुथ सक्षमीकरण’ अभियानाला सुरवात करण्यात आली. मोहननगर येथील प्रभाग क्रमांक १४ पासून स्वतः भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी जुने-जाणते कार्यकर्ते तसेच बूथ प्रमुखांच्या ‘डोअर टू डोअर’ भेटीगाठी घेऊन चर्चा केली. शहर भाजपाचा हा ‘बूथ सक्षमीकरण’ पॅटर्न कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक १४, मोहननगर परिसरातील जुन्या कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा लोखंडे व अनिल लोखंडे यांच्या घरापासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. आमदार लांडगे यांच्यासह प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा प्रदेश महिलाअध्यक्ष उमा खापरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजपा जिल्हा सरचिटणीस नगरसेवक बाबु नायर, भाजपा जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उज्वला गावडे, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, समीर लोखंडे, नंदू भोगले, तेजस्विनी दुर्गे, कमलेश लुंकड, अजिंक्य गोळे, नागेश वाघमोडे, सदाशिव गोरड, बबनराव देवकाते, चैतन्य देशपांडे, प्रकाश हगवणे, विठ्ठल कराळे, विक्रम वाहिले, योगेश देशपांडे, रमेश येवले, लखन पाटकर, देव दुर्गे, प्रथमेश दंगाणे, गणेश बंब आदी उपस्थित होते. भाजपा जिल्हा सरचिटणीस राजु दुर्गे, गणेश लंगोट आणि कैलास कुटे यांनी या अभियानाचे नियोजन केले.

यावेळी शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यासह पदाधीकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे बुथप्रमुख, जुने जाणते कार्यकर्ते, इतर पदाधीकारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी थेट चर्चा करत पक्षवाढ, संघटन, आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करावी लागणारी कामे याबात सूचना आणि मार्गदर्शन केले. तसेच आमदार लांडगे यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या समजावून घेत त्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. हा उपक्रम असाच सुरु राहणार असून आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरभरात राबविण्यात येणार आहे.

मोहननगरमधील पराभवाची भाजपाला सल…
मोहननगर प्रभाग १४ मध्ये भाजपाचा एकही नगरसेवक नाही. मागील निवडणुकीत केवळ ५५ मतांनी येथील उमेदवाराचा पराभव झाला होता. याची सल भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे बूथ सक्षमीकरण अभियानाचे रणशिंग फुंकले गेले. भाजपा जिल्हा सरचिटणीस राजु दुर्गे त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश लंगोटे आणि कैलास कुटे यांनी या अभियानाचे नियोजन केले. आमदार लांडगे यांनी पक्षाच्या बुथ प्रमुखांच्या घरी भेटी देऊन त्यांच्याशी भाजपा पक्ष वाढी संदर्भात आणि आगामी महापालिका निवडणुकीतील आपल्याला कराव्या लागणाऱ्या कामा संदर्भात संवाद साधला.
कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह…

आमदार महेश लांडगे यांच्याबाबत पदाधीकारी आणि ग्राउंड लेव्हल ला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आकर्षण आहे. अभियानाच्या पार्श्वभूमीवर थेट आमदार घरी येऊन चर्चा करत असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. तसेच अनेकांनी आमदार लांडगे घरी आल्याचे तसेच चर्चा करत असल्याचे फोटो, व्हिडीओ शेअर केले. आमदार लांडगे यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप देऊन जोमाने कामाला सुरवात करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून याचा पक्षवाढीला फायदा होणार आहे.