स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निसर्ग मित्रच्या वनमेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
491

देहूरोड, दि. ८ (पीसीबी) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर रविवारी (दि. ७) वनमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वनमेळाव्यात २५० पेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी, संस्था आणि नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, मेळाव्याला दहा वर्षे पुर्ण झाले.

यावेऴी पराग कुलकर्णी, दत्तात्रय माळी, प्रशांत बेंद्रे, मनेश म्हस्के, अर्जून कुंभार, सुनील गुरव,  प्रमोद जोशी, भालचंद्र वडके, नानिवडेकर काका, श्रेया पंडीत, मानसी म्हस्के, प्रभाकर कारंडे, हेमंत थोरात, विकास देशपांडे, नितीन बढे, रवी मनकर, प्रशांत बेंद्रे, राहुल माने, अष्टेकर, रवी मनकर, विजय सातपुते, दिपक पंडीत, लाला माने, दिपक नलावडे यांच्यासह ओम निसर्ग मित्र चिंचवड, पिंपळे गुरव ग्रामस्थ, पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरिंग क्लब, इटॉन कंपनीचे प्रतिनिधी, पोलिस नागरिक मित्र, संस्कार प्रतिष्ठान, साई कॉम्प्युटर इंस्टीट्युट, आवर्तण ग्रुपचे सदस्य आदी उपस्थित होते.

यावेळी धनंजय शेडबाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन हरित घोरावडेश्वर या प्रकल्पाची माहिती दिली. तसेच वृक्षसंवर्धनाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. वणव्यापासून झाडांचे रक्षण करण्यासाठी डोंगरावरील गवत कापण्याचे काम निसर्ग मित्र अव्याहत पणे करीत आहेत. परंतू डोंगराचा विस्तार व कामाची व्याप्ती मोठी असल्याने सावरकर मंडळ महिला विभागाने पुढाकार घेऊन एक नवीन गवत कापायचे मशीन भेट दिले. यामध्ये अन्य निसर्ग मित्रांनीही आर्थिक योगदान दिले. तसेच यावेळी डॉ.प्राजक्ता पठारे, श्रीकांत मापारी आणि जाधव यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शैलेश भिडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.