स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये; खासदार बनसोडे यांचे प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर

0
6288

सोलापूर, दि. २६ (पीसीबी) – स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये, असे प्रत्युत्तर भाजप खासदार शरद बनसोडे यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेला दिले आहे. सोलापूरात आज (शुक्रवार) झालेल्या  कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी  खासदार बनसोडे बेवडे आहेत,  असा उल्लेख केला होता.

यावर बनसोडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.  मुंबईत काय काय चालते, ते उघड करावे लागेल. सुशिलकुमार शिंदे यांचे रेल्वेतील किस्सेसुद्धा आम्हाला माहित आहेत. स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये. शेवटची वॉर्निंग प्रणिती ताई, वैयक्तिक टीका केली, तर तुमच्याही वैयक्तिक आयुष्यातील किस्से बाहेर काढले जातील, ‘ अशा शब्दांत बनसोडे यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, नगरसेविका फिरदोस पटेल यांनी विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी आमदार शिंदे बोलत होत्या. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्हातील दोन मंत्री आणि बेवडे खासदार असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच आता तुम्ही पेपरमध्ये बघत असाल, यांचे दोन मंत्री, यांचे एकच काम आहे. एकमेकांशी भांडण करा, त्यांचे गट सांभाळा. आणि पेपरमध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्‌घाटने करा. म्हणजे आयत्या बिळात नागोबा, असे आमदार शिंदे यांनी म्हटले होते.