सोहराबुद्दीन शेख कथित चकमक प्रकरणी सर्व २२ आरोपी दोषमुक्त

0
535

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (शुक्रवार) या गुन्ह्यातील सर्व २२ आरोपींना सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले.

२००५  मध्ये सोहराबुद्दीन आणि त्याच्या पत्नीचा चकमकीत मृत्यू झाला होता.  तर २००६ मध्ये या घटनेचा साक्षीदार तुलसीराम प्रजापतीचा चकमकीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला. आज या खटल्याची न्यायालयाने सुनावणी घेतली आणि प्रकरणातील सर्व २२ आरोपींना सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले. सरकारी वकिलांनी याप्रकरणात २१० साक्षीदारांना हजर केले होते. मात्र समाधानकारक आणि ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. तसेच साक्षीदारांनीही साक्ष फिरवली. यामुळे गुन्ह्यातील सर्व २२ आरोपींना दोषमुक्त केले.