जिजाई प्रतिष्ठानकडून दहावीतील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी चिंचवडमध्ये मार्गदर्शन शिबीर

0
705

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील दहावीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शनिवारी (दि. २२) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल. दहावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना भिती असते. त्याचप्रमाणे या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्नही असतात. अभ्यास कसा करावा?, पेपर कसा सोडवावा?, परीक्षेची तयारी कशी करावी?, वेळेत पेपर कसा सोडवावा?, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांमध्येही आत्मविश्वास वाढविण्यासाठी या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका सीमा सावळे यांनी सांगितले.