सोलापूरात मृतांचा आकडा लपविणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

0
365

सोलापूर, दि. २३ (पीसीबी) : सोलापूरातून तून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सोलापुरातील तब्बल 40 कोरोनाबाधित मृतांचा आकडा तीन रुग्णालयांनी महापालिका यंत्रणेकडे पाठवला नाही. जून आणि मे महिन्यात मृत झालेल्या 40 लोकांची यादी आज (22 जून) पालिकेला प्राप्त झाली.

कम्युनिकेशन गॅपमुळे मृतांचा आकडा पालिकेपर्यंत पोहोचला नाही, अशी माहिती आहे. महानगर पालिकेच्या यंत्रणेत 40 कोरोनाबाधित मृतांची आज अखेर नोंद करण्यात आली. त्यामुळे सोलापुरातील कोरोना बळींची संख्या 213 वर पोहोचली आहे.कोरोना बळींची माहिती दडविल्याप्रकरणी सिव्हील हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय, मार्कंडेय रुग्णालयाला पालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, ज्या डॉक्टरांकडे या तीन रुग्णालयांची जबाबदारी होती, त्यांच्यावरही पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

अशाच पध्दतीने कोरोनामुळे झालेले मृत्यू दडविण्यात आले होते. पुणे, मुंबई, औरंगाबाद या शहरांतही मृतांचा आकडा लपविण्यात आला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत आरोप केला होता. त्यानंतर मुंबईत ९०० मृतांचा आकडा जाहीर कऱण्यात आला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही या विषयावर आवाज दिला होता. पुणे शहरातील ८६ रुग्णांचा मृत्यू नंतर जाहीर कऱण्यात आले होते. अन्य आजाराने मृत, परंतु नंतरच्या अहवालात कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले काही मृत्यू समोर आल्यावर आकडा वाढला. खासगी रुग्णालयांतून मृतांची माहिती लपविण्याचे प्रकार सर्रास होतात, असे लक्षात आल्याने आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.