सेट मॅक्सवरती सारखा ‘सूर्यवंशम’ का दाखवला जातो? यामागची ‘बिझनेस स्ट्रॅटेजी’ नक्की काय आहे?

0
627

आपल्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली असेल कि, जेव्हा जेव्हा आपण सेट मॅक्स चॅनल लावतो तेव्हा सरार्स पणे आपल्याला ज्येष्ठ अभिनेते, बॉलिवूडचे शेहनशाह अभिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट पाहायला मिळतो. त्यामुळे आता सेट मॅक्स आणि सूर्यवंशम असं जणू एक समीकरणचं बनलंय. आपल्या पैकी कित्येक जणांना हा चित्रपट पाठ सुद्धा झाला असेल. पण बच्चनजी यांनी आपल्या कारकिर्दीत कित्येक चित्रपट केले परंतु त्यांचा सूर्यवंशम हा चित्रपट सारखासारखा का दाखवला जातो? असा प्रश्न आपल्याला पडतोच. कारण जर का नीट लक्षपूर्वक पाहिलं तर ‘आयपीएल’ सोडल तर इतर वेळेस आपल्याला सूर्यवंशम हमखास पाहायला मिळणारच. त्यामुळे आता आपण प्रेक्षक सुद्धा या चित्रपटाला कंटाळले आहेत. पण, सेट मॅक्स चॅनेल सतत सूर्यवंशम चित्रपट का दाखवते? त्यामागे नक्की काय कारण आहे? चॅनेलच्या तोचतोचपणा मुळे आपण आपले प्रेक्षक गमावून बसू हा विचार त्यांना कसा करावासा वाटत नाही बरं? तर या प्रश्नच उत्तर असं आहे कि…. १९९९ साली सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने ‘सूर्यवंशम’च्या प्रसारणाचे हक्क तब्बल १०० वर्षांसाठी विकत घेतले. म्हणजे, तब्बल २०९९ सालापर्यंत सेट मॅक्स वर सूर्यवंशम हा दिसत रहाणारच. कुठल्याही चॅनलला हिट चित्रपटाचे हक्क विकत घेणं शक्य असतं. त्यामुळे उत्तम चित्रपट दाखवण्याची शक्यता हि मर्यादित असते. मग ज्या दिवशी किंवा दिवसाच्या ज्या वेळी फारसे दर्शक नसतात अश्या वेळी सूर्यवंशम सारखे चित्रपट दाखवले जातात. अश्या चित्रपटांना ‘गॅप फिलर’ म्हंटल जात. आणखी एक कारण द्यायचं झालं तर, एकच चित्रपट वा कन्टेन्ट रिपीट दाखवून सोनी ग्रुप गेम थेअरीचा वापर करतंय असं दिसून येते. म्हणजेच काय, तर सोनी ग्रुपला सेट मॅक्सचे मार्केटमधील इतर स्पर्धक म्हणजेच इतर वाहिन्यांना बाहेर करायचे नाही. त्यांना ही स्पर्धा सुरूच ठेवायची आहे. सोनी ग्रुप हे एन्टरटेन्मेन्ट इंडस्ट्री मधील एक मोठे नाव असल्यांन त्यांना नवीन युनिक कन्टेन्ट लोकांपुढे आणणे म्हणावं तस जास्त कठीण नाही. पण यामुळे इतर वाहिन्या मागे पडतील, सोनीला कोणताही स्पर्धक उरणार नाही आणि मार्केटमध्ये त्यांची मोनोपॉली निर्माण होईल आणि नेमकी हीच गोष्ट सोनी ग्रुपला नको आहे. कारण जर अस केलं तर अजून नवनवीन चॅनेल्स तयार होण्यास वेळ लागणार नाही आणि चित्रपट दाखवणाऱ्या भारतीय चॅनेल्समध्ये सगळ्यात वरचढ होण्यासाठी स्पर्धा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे जर आपण एकच कन्टेन्ट पुन्हापुन्हा दाखवला तर आपण स्पर्धा थंड ठेवू शकतो हे सोनी ग्रुपने हेरलं आणि आणि त्याचवेळी इतर वाहिन्यांना देखील थोपवून धरलं.जर विचार केला तर सोनी ग्रुपने उद्या सेट मॅक्सवर नवनवीन चित्रपट आणि इतर कन्टेन्ट दाखवायला सुरुवात केली तर ते एक प्रकारे चित्रपट दाखवणाऱ्या सर्वच भारतीय चॅनेल्समध्ये स्पर्धा निर्माण होईल. मग सर्वच चॅनेल्समध्ये प्रेक्षकांना आपल्या बाजूने करण्यासाठी नवनवीन कन्टेन्ट दाखवण्याची चढाओढ सुरु होईल आणि हळूहळू कन्टेन्ट खरेदी करण्यासाठी सध्याच्या रकमेपेक्षा अधिक पटीने रक्कम मोजावी लागले. ज्याचा परिणाम असा होईल कि, सोनी ग्रुप आणि इतर चॅनेल्ससाठी बिझनेसच्या दृष्टीने नक्कीच तोटा सहन करावा लागेल. शिवाय, सतत सुर्यवंशम चित्रपट दाखवून सोनी ग्रुप इतर चॅनेल्सला असे भासवू पाहते की सेट मॅक्सला “ग्रोथ” करण्यामध्ये कोणताही रस नाही. सेट मॅक्स “सेम पेज” वरच आहे हे इतर चॅनेल्सन पटवून देत आहे. जेणेकरून इतर चॅनेल्स देखील सोनी ग्रुप कॉम्पीटीशन मध्ये नाही असा आपला समज करून कोणतीही नवी स्पर्धा निर्माण करणार नाहीत. जे सोनीच्या फायद्याचे ठरेल. एकूण पाहता हि एक बिझिनेस स्ट्रॅटजि असून फक्त भारतामधीलच नाही तर जगभरातील अनेक मोठ्या मोठ्या वाहिन्या ही स्ट्रॅटेजी फॉलो करताना दिसतात.