सुशांत आत्महत्या प्रकरण; पवनाधरण परिसरात तपासा दरम्यान एनसीबीच्या हाती लागली महत्वाची माहिती…मोटार चालकाने केले खळबळजनक खुलासे

0
457

मावळ, दि.१७(पीसीबी) : सुशांत प्रकरणाचा तपास करत ‘एनसीबी’ची टीम आता मावळला पोहचली आहे. आता पवना धरणाच्या जवळ आपटी-गेव्हंडे गावानजीक असलेल्या एका बेटावर सिने क्षेत्रातील कलाकार पार्टी करण्यासाठी यायचे, अशी माहिती समोर येत आहे. सुशांत सुद्धा इथे आल्याची माहिती मोटारबोट चालकाने अंमली पदार्थ विरोधी विभागाला (एनसीबी) दिली आहे. सुशांत सोबत अनेक कलाकार सुद्धा इथे आल्याचे मोटार चालकाने स्पष्ट केले.

पवना धरण परिसरात ‘हँग आऊट व्हिला’ नावाच्या फार्महाऊसवर सुशांत कधीकधी विश्रांतीसाठी येत असे. त्यामुळे एनसीबीच्या पथकाने गेल्या आठवड्यात त्या फार्महाऊसची तपासणी केली आहे. त्यानंतर पवना धरणाक्षेत्रात बोटींचा व्यवसाय करणाऱ्या जगदीश दास यांच्याकडून हि माहिती एनसीबीला मिळाली आहे.

पवना धरणक्षेत्रातील एका बेटावर सुशांत विश्रांतीसाठी जायचा. त्या ठिकाणी त्याला पोहचवून परत आणण्यासाठी प्रत्येकवेळी जगदीश दास यांना तब्बल 16 हजार रुपयांचा मोबदला मिळायचा. या ठिकाणी सुशांत सोबत आतापर्यंत रिया चक्रवर्ती, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर हे देखील आल्याचे त्यांनी एनसीबीला सांगितले आहे. जगदीश दास हे गेली कित्येक वर्षे पवना डॅम येथे मोटारबोट चालविण्याचे काम करतात. दोन वर्षांपूर्वी अब्बास आणि रमजान अलीने जगदीश यांना फोन करून बंगल्यावर बोलवून घेतलं होतं आणि पवना धरणात बोटींग करायचे असल्याचे सांगून त्याने जगदीशची मोटारबोट भाड्याने घेतली होती.

सुशांत त्यावेळी अब्बास अलीबरोबर पहिल्यांदाच जगदीशच्या मोटारबोटवर आला होता. केलेल्या या कामासाठी त्यांनी जगदीशला 16 हजार रुपयांची रोकड दिली होती. त्यानंतर सुशांतने अनेक वेळा पवना धरणातील एका बेटावर जाण्यासाठी जगदीश यांची मोटारबोट वापरली आहे. या बेटावर अंमलीपदार्थ घेतल्याबद्दल काही पुरावे मिळतात का? याबाबत एनसीबी पथकाकडून तपासणी केली जात आहे.