सिद्धू तुम्ही राजकारण कधी सोडताय ? मोहालीत पोस्टरबाजी

0
480

मोहाली, दि, २१ (पीसीबी) – माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील कॉंग्रेसचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू कायम चर्चेत असतात. यावेळी ते राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. राहुल गांधी हरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं सिद्धू म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय संन्यासाचे पोस्टर लागले आहेत.

या पोस्टर मध्ये आता राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाल्यानंतर, सिद्धू संन्यास कधी घेणार? राजकारण कधी सोडणार? असा प्रश्न त्यांना विचारला जातोय. सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी यावरून ट्रोल केलं आहे. या पोस्टर्सनंतर राज्यातलं सिद्धूविरोधातलं राजकारण आणखी तापणार आहे. तसेच सिद्द्धू आपल्या वक्तव्यावरून मागे हटत नाही, असं म्हणतात. मग सिद्धू आपल्या वक्तव्यावरून मागे का हटले, याचीही आठवण काहींनी करून दिली. आता सिद्धू या सगळ्या टिकेला काय उत्तर देणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

दरम्यान, सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावरही टीका केली होती. आपल्या पत्नीला उमेदवारी न दिल्यामुळे सिद्धू नाराज होते. आपल्याच पक्षाच्या दिग्गज नेत्यावर टीका केल्यामुळे सोशल मीडियावरही सिद्धू ट्रोल होत राहिले. सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत.