प्राचार्य डॉ अभिजीत शशिकांत कुलकर्णी यांना ‘राष्ट्रीय आदर्श विद्या सरस्वती’ पुरस्कार

0
960

पिंपरी, दि, २१ (पीसीबी) – ग्लेशियर जर्नल  फौंडेशन ग्लोबलजमेंट कौन्सिल अहमदाबादतर्फे २०१९ देशातील सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक  राष्ट्रीय आदर्श विद्या सरस्वती पुरस्कार डॉ अभिजीत शशिकांत कुलकर्णी याना मिळाला.

डॉ अभिजीत शशिकांत कुलकर्णी सध्या अशोकराव माने इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च  सावे शाहुवाडी येथे प्राचार्य म्हणून काम करत आहेत. पुणे विद्यापीठातून , मास्टर इन  फार्मसी डिग्री घेतली आहे. त्यांनी त्यावेळेस यकृत संरक्षणावर संशोधन केले होते व पुढील वाटचालीकरीत डॉ. एम.जी.आर. वैद्यकीय विद्यापीठ मधून डॉक्टरेट पदवी प्रप्त केली.  डॉक्टरेट चे संशोधन मध्ये त्यांनी ५ वन औषधी चे मिश्रण करून यकृत आणि पोटाचे  विकारांवर महत्वाचे असे संशोधन केले. त्यांचा औषधनिर्माणशास्त्र विषय असून त्यांनी सर्व संशोधन हे एक्सपेरिमेंटल ऍनिमल वर केले आहेत.

डॉ अभिजीत याना १० वर्षे पेक्षा जास्त शैक्षणिक आणि ८ वर्षे संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय स्थरावर आपले १६ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. डॉ अभिजीत यांनी कौशल्याचा अनुभव घेत असताना प्रतिष्टीत  प्रकाशन माध्यमातून ०२ पुस्तके लिहलेली आहेत. त्यांच्या सह निर्देशनात मास्टर इन फार्मसी चे ०६ विद्यार्थी पास झाले आहेत तर ०२ पीएचडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

या सर्व उपक्रमाचा आढावा घेत ग्लोबल मॅनॅजमेण्ट कौन्सिल ने त्यांना २०१९ चा  राष्ट्रीय आदर्श विद्या सरस्वती पुरस्कार जाहीर केला आहे. सोबत त्यांना देशाच्या सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक असे पात्र ठरवले आहे.