सिद्धार्थ शिरोळेंचा ‘तरुण खासदार’ म्हणून उल्लेख चंद्रकांत पाटलांनी घेतला मागे …

0
311

पुणे: पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतच्या बैठकीची माहिती देताना बोलण्याच्या ओघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा उल्लेख ‘आमचे तरुण खासदार’ असा केला. त्यानंतर उपस्थितींमध्ये कुजबूज सुरू झाली. पत्रकारांनी ती चूक लक्षात आणून देताच चंद्रकांतदादांनी  ते चुकून म्हटलेले मागे घेतो,’ असे सांगून तोंड फुटू पाहणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला. 

पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेला संरक्षण विभागाकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर पुण्यात आज (ता. ८ जानेवारी) त्यासंदर्भाने बैठक घेण्यात आली. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शिरोळेंचा उल्लेख वरीलप्रमाणे केला. आमदार शिरोळे यांच्या संदर्भात झालेल्या उल्लेखाबाबत पत्रकारांनी त्यांना शिरोळे हे भविष्यातील खासदार आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर आमदार पाटील म्हणाले की, भविष्यातील अनेक वर्षे सिद्धार्थ शिरोळे हे खासदार होण्याची शक्यता नाही. कारण, आमच्याकडे फार मोठी रांग आहे. मी चुकून म्हटलेले मागे घेतो आणि तरुण आमदार असे म्हटतो. भाजप हा असा पक्ष आहे की एक झाल्यावर दुसरा, दुसरा झाल्यावर तिसरा अशी एक रांग तयार असते. बाकीच्या ठिकाणी प्रॉब्लेमच असतो, की आता कोण. रांगेत राहणारे हेल्दी मूडमध्ये असतात, असा विनोदही त्यांनी शेवटी केला.