शहरात कोरोनाचा विस्फोट; १० दिवसात रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

0
297

पिंपरी दि. १०(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होऊ लागली. मागील दहा दिवसात 7 हजार 77 नवीन रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून 31 डिसेंबर रोजी 462 वर असलेली सक्रिया रुग्णांची संख्या 6 हजार 694 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होऊ लागली. 1 जानेवारी रोजी 112, 2 जानेवारी 175, 3 जानेवारी 149, 4 जानेवारी 350, 5 जानेवारी 590, 6 जानेवारी रोजी 817, 7 जानेवारी रोजी 1 हजार, 8 जानेवारी 1 हजार 73, 9 जानेवारी रोजी 1 हजार 535 आणि 10 जानेवारी रोजी 1 हजार 276 अशा तब्बल 7 हजार 77 नवीन रुग्णांची मागील दहा दिवसात नोंद झाली. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून 31 डिसेंबर रोजी 462 वर असलेली सक्रिया रुग्णांची संख्या 6 हजार 694 वर पोहोचली आहे. त्यातील 6 हजार 269 रुग्ण गृहविलगीकरणात असून 425 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

वाढत्या रुग्णांमध्ये लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आजमितीला महापालिकेच्या चार रुग्णालयात 58 रुग्ण दाखल असून उर्वरित रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) आहेत. 6 हजार 694 सक्रिय रुग्णांपैकी 7 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपचार सुरु आहेत. तर, 3 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. या लाटेत रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.

”शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी, त्यात लक्षणेविहरित, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. 95 टक्के रुग्ण लक्षणेविरहित असून होम आयसोलेट आहेत. गंभीर रुग्णांचे, मृत्यूचे प्रमाण कमी आहे. महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी 7 रुग्ण आयसीयूत तर 3 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये पण काळजी घ्यावी. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले यांनी केले. ,