सिद्धार्थ पिठानीला सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
567

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता एक वळण मिळालय. सुशांतच्या मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतलं होतं.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्स सेवनाप्रकरणी अनेकांची चौकशी झाली. अनेकांना ताब्यात घेण्यात आलं. याच प्रकरणात सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानी याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतलं होतं. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.