सिंचन घोटाळा : यापुढेही चौकशीला पूर्ण सहकार्य करीत राहीन – अजित पवार

0
419

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून यापुढेही चौकशीला मी पूर्ण सहकार्य करीत रहीन, असे त्यांनी म्हटले आहे.