सारखा खांदा का दाबता, मी फिट आहे; आमदार शिवेंद्रराजेंचे खासदार उदयनराजेंना उत्तर  

0
1590

सातारा, दि. २ (पीसीबी) – सारखा खांदा का दाबता, मी फिट आहे, पाहीजे तर प्रात्यक्षिक दाखवू शकतो, अशी कोटी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी बोलताना केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.  

जावली तालुक्यातील कुडाळ येथील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात  खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांनी आपला वाद विसरून एकमेकांशी  हस्तांदोलन केले.  यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजे यांचा खांदा दाबला. त्यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी कोटी केली.

यावेळी  उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सारखा सारखा खांदा का दाबत आहात. त्यावर उदयनराजे म्हणाले,  तुमचा फिटनेस बघत आहे. आमचा फिटनेस कायमच असतो, मी फिट आहे, हवे तर प्रात्यक्षिक करून दाखवतो. यावर एकच हास्यकल्लोळ उडाला.