येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खातेबदल ?

0
706

मुंबई, दि. २ (पीसीबी) – राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा येत्या काही दिवसांत विस्तार किंवा खातेबदलाची शक्यता  सूत्रांनी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची जुलैमध्येच विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली आहे. त्याला आता सहा महिने होत आहेत. त्यामुळे दीपक सावंत यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक लवकरच करावी लागणार आहे. कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार सध्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे कृषीमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे तरी  द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर  काही महामंडळाच्या नेमणुकाही करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.