सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप आत्महत्याप्रकरणी दीपक मानकरसहीत सात जणांवर मोका

0
2249

पुणे, दि. २४ (पीसीबी) –  सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह त्यांच्या सात साथीदारांना विशेष न्यायालयाने मोका कायद्याअंतर्गत तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०, रा. जय भवानीनगर, कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, मांडवी खुर्द, हवेली), अतुल शांताराम पवार (वय ३६, रा. शांतीनगर, येरवडा), विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा. येरवडा), नाना बाळू कुदळे (वय ४०, रा. हनुमाननगर), अजय चंद्रकांत कंदारे (वय २७, घनवट पाटील, एरंडवणा) अशी ‘मोका’अंतर्गत कोठडी झालेल्या सात जणांची नावे आहेत. कर्नाटकी यांना यापूर्वी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तर दीपक मानकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.