“सामनाचं नाव बदलून ‘सोनिया नामा’ करा”- जीव्हीएल नरसिम्हा राव

0
567

नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) – काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक साधत शिवसेनेने महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली. तब्बल २८ वर्ष सोबत असलेल्या मित्राशी सेनेने वैर धरत काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली. यामुळे भाजपचे दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेते खवळून उटले आहेत. भाजपचे खासदार जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी शिवसेनेवर कडवट टीका करत ‘सामना’चं नाव बदलून ‘सोनियानामा’ करा, असं म्हटलं आहे.

जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या गोडसेभक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. तुम्ही आणि तुमच्या आमदारांनी एका राजवटीसमोर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली आहे. सामनाचं नाव ‘सोनिया नामा’ करत आता पूर्ण आत्मसमर्पण करा. तुमच्या तिसऱ्या दर्जाच्या वृत्तपत्रात येणाऱ्या मूर्ख संपादकीय ते सहन करणार नाहीत”.

सामनाच्या तिसऱ्या दर्जाच्या वृत्तपत्रात येणारं मूर्ख संपादकीय ते सहन करणार नाहीत, असंही नरसिम्हा राव यांनी म्हटलं आहे.