सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटलांना भाजपची उमेदवारी ?

0
619

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  सातारा मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव समोर आले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधी पाटील विधानपरिषदेचे आमदार होते.

नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण येथे माथाडी मतदारांशी नरेंद्र पाटील यांचा चांगला संपर्क आहे. मराठा मोर्चात  सातारा पट्ट्यातील लोकांचा अधिक समावेश होता. त्यामुळे ही मते नरेंद्र पाटील यांच्या पारड्यात  पडण्याची शकयता आहे.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सातारा मतदारसंघ हा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत ही जागा भाजपने आपल्याकडेच ठेवली आहे. त्यामुळे येथून भाजपकडून पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.