सांगवीत सिलेंडरच्या स्फोटात बिर्याणी हाऊस जळून खाक

0
1123

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – सांगवी येथील एका बिर्याणी हाऊसमध्ये आज (बुधवार) सकाळी सातच्या सुमारास सिलेंडरमधून गॅस गळती होऊन भिषण स्फोट झाला. या थरारक घटनेतून दोनजण थोडक्यात बचावले आहेत.

सलमान अमजद खान यांच्या मालकीचे हे बिर्याणी हाऊस आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान यांना बिर्याणीची मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे त्यांनी आज सकाळी लवकर कामाला सुरूवात केली होती.  सलमान आणि त्यांचा कारागीर बिर्याणी बनवत असताना अचानक गॅस गळती झाली. हे समजताच सलमान आणि त्यांच्या कारागिराने हॉटेलाबाहेर धाव घेतली. आणि जीव वाचला. इतक्यात गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच संत तुकारामनगर आणि रहाटणी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमध्ये बिर्याणी हाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.