सांगली पूरस्थिती: ३५० जण शाळेच्या छतावर मदतीच्या प्रतीक्षेत

0
490

सांगली, दि. ८ (पीसीबी) – मौजे डिग्रज येथे अत्यंत गंभीर परिस्थिती असून ३५० नागरिक एका शाळेच्या छतावर बसून आहेत. पाणी काही फुटावर आले असून हे लोक पुरात वाहून जाण्याची शक्यता आहे. सांगली प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांपर्यंत हा निरोप पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.

सतत सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीत सध्या भीषण परिस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांत आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे. पूरस्थितीमुळे बेघर झालेल्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. दरम्यान सांगलीमध्ये पुरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटली असून ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.